खानापूर : नुकत्याच खानापूर येथे पार पडलेल्या बुद्धिबळ व बॅडमिंटन स्पर्धेत शासकीय माध्यमिक विद्यालय, शिरोली, ता. खानापूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बुद्धिबळ स्पर्धेत कु. सानिका कोवाडकर, कु. सानिका गावकर, कु. परशराम गावकर आणि कु. महादेव दळवी यांनी चमकदार कामगिरी केली.
तर बॅडमिंटन स्पर्धेत कु. नागराज गावडा आणि कु. प्रभाकर सुतार यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले.
या यशाबद्दल शाळा सुधारणा समिती, मुख्याध्यापिका श्रीमती अनिता चिगारे, शारीरिक शिक्षक श्री. पी. एस. पाटील तसेच इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
