“विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात; गोडसे शैक्षणिक निधीतर्फे बक्षीस वितरण”

“विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात; गोडसे शैक्षणिक निधीतर्फे बक्षीस वितरण”

बेळगाव : श्री. खेमाजीराव तुकाराम गोडसे शैक्षणिक निधी (ट्रस्ट) यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक बक्षीस वितरण समारंभ सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सह्याद्री मल्टीस्टेट पतसंस्था, महिला विद्यालयाजवळ, बेळगाव येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.

या कार्यक्रमास बी.के. मॉडेल हायस्कूल, बेळगावचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. के. एल. माजुकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
यावेळी श्री.के. एल. माजुकर, डॉ. अजय काळे आणि डॉ. सुचिता भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच जीवनातील विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करावे, तसेच सातत्य, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या माध्यमातून यश संपादन करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमास श्री. संग्राम चंद्रकांत गोडसे (मुख्य ट्रस्टी), श्रीमती शशिकला पाटील (उपमुख्य ट्रस्टी), श्री. विनोद सदाशिवराव भोसले, श्री. शिवाजीराव निळकंठराव हांडे, डॉ. स्मिता काळे, सौ. स्मिता घाटगे , फलटणहून आलेले श्री.किशोर शिवाजीराव गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ ट्रस्टी श्री. अप्पासाहेब गंधाडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रभाकर पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक व उपस्थित मान्यवरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.37 गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 + 13 =

error: Content is protected !!