बेळगाव : जाईंट्स ग्रुप बेळगाव मेनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा जाईंट्स भवन येथे उत्साहात पार पडला.
या तिन्ही स्पर्धांमध्ये शहरातील १३ शाळांमधील एकूण ८६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २७ गुणवंत स्पर्धकांची विजेते म्हणून निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला जाईंट्स ग्रुप बेळगावचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, व्हाईस प्रेसिडेंट अरुण काळे, सचिव विश्वास पवार, युनिट डायरेक्टर संजय पाटील, फेडरेशन ऑफिसर सुनील मृगजेकर, माजी अध्यक्ष शिवराज पाटील आणि अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे स्पॉन्सर राहुल बेळवलकर यांच्यासह जाईंट्स ग्रुपचे सदस्य आनंद कुलकर्णी, विजय बनसूर, मुकुंद महागावकर, पुंडलिक पावशे, दुर्गेश हरिते, शिरशेल माळशेट्टी, जयवंत पाटील, आकाश लाटकर तसेच जाईंट्स ग्रुपचे अन्य सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि वक्तृत्व व लेखन कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
