बेळगाव : प्रतिनिधी
बेळगाव येथील महाद्वार रोड, क्रॉस क्रमांक ४ येथे श्री गणहोम युवक मंडळाच्या वतीने संकष्ट चतुर्थीनिमित्त २९ ऑक्टोबर रोजी आयोजित गणहोम व महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी विधिवत पूजा-अर्चा आणि मंत्रोच्चारांच्या गजरात गणहोम पार पडला. यावेळी परिसरातील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.
सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिसरातील नागरिकांसह अनेक गणेशभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री गणहोम युवक मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या देणगीदार, गणेशभक्त आणि परिसरातील नागरिकांचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
