बेळगाव : ईद-ए-मिलाद सणानिमित्त बेळगाव शहरात 26 ऑगस्ट 2026 रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील विविध मार्गांवर वाहतूक वळविण्यात येणार असून, मिरवणूक संपेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.
मिरवणुकीला पिंपळ कट्टा येथून सुरुवात होऊन फोर्ट रोड, मुजावर खूट, सेंट्रल बस स्टँड, मार्केट पोलीस स्टेशन क्रॉस, संगोळी रायण्णा सर्कल, डी.सी. ऑफिस गेट, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, एन.डी. खूट सिग्नल, धर्मवीर संभाजी सर्कल, फिश मार्केट, ग्लोब सर्कल मार्गे असद खान दर्गा येथे सांगता होणार आहे.
सकाळी 8 वाजल्यापासून वाहतूक बदल
26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत मुख्य मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी: किल्ला तलाव–अशोक स्तंभ सर्कल–RTO सर्कल–चन्नम्मा सर्कल मार्गावरील वाहतूक अशोक स्तंभ → लेकव्ह्यू हॉस्पिटल → कनकदास सर्कल → कॅन्सर हॉस्पिटल → KLE छत्री → हिंदाल्को अंडरब्रिज → बॉक्झाईट रोड → हनुमाननगर डबल रोड → हिंदळगा गणेश मंदिर → गांधी सर्कल → शौर्य चौक → केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 → शारकत पार्क → MLIRC कॅन्टीन क्रॉस → मिलिटरी महादेव मंदिर क्रॉस मार्गे खानापूर रोडकडे वळवण्यात येईल.
गोगटे सर्कल रेल्वे फ्लायओव्हरकडून शहरात येणाऱ्या वाहनांनी गोगटे सर्कलवरून डावीकडे काँग्रेस रोडमार्गे जाऊन मिलिटरी महादेव मंदिराजवळ उजवीकडे वळावे. पुढे MLIRC कॅन्टीन क्रॉस मार्गे प्रवास करता येईल.
खानापूरहून काँग्रेस रोडमार्गे शहरात येणाऱ्या वाहनांनी मिलिटरी महादेव मंदिराजवळ डावीकडे वळून MLIRC कॅन्टीन क्रॉस, शारकत पार्क, केंद्रीय विद्यालय क्रमांक 2, शौर्य चौक, गांधी सर्कल, हिंदळगा गणेश मंदिर, हनुमाननगर डबल रोड आणि बॉक्झाईट रोडमार्गे पुढे जावे.
गोगटे सर्कलहून रेल्वे स्टेशन, स्टेशन रोड आणि हेड पोस्ट ऑफिस सर्कलमार्गे शनी मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांनी गोवा वेस सर्कल → महात्मा फुले रोड → बँक ऑफ इंडिया सर्कल → भटकांडे स्कूल क्रॉस → जुना P.B. रोड मार्गाचा वापर करावा.
नाथ पै सर्कलहून बँक ऑफ इंडिया सर्कल, SPM रोड आणि कपिलेश्वर फ्लायओव्हरमार्गे शनी मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांनी भटकांडे स्कूल क्रॉस → जुना P.B. रोड किंवा खासबाग बसवेश्वर सर्कल → संभाजी गल्ली रोड या पर्यायी मार्गांचा वापर करावा.
जिजामाता सर्कल, देशपांडे पेट्रोल पंप, नर्गुंदकर भावे चौक/कांबळी खूट, पिंपळ कट्टा आणि पाटील गल्लीकडून येणारी वाहतूक VRL Logistics → भटकांडे स्कूल क्रॉस → बँक ऑफ इंडिया सर्कल → महात्मा फुले रोड → गोवा वेस सर्कल मार्गे वळविण्यात येणार आहे.
अवजड वाहनांना प्रवेशबंदी
26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत सर्व दिशांनी शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश आणि वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी राहणार आहे.
मिरवणूक मार्गावर पार्किंगला बंदी
मिरवणुकीच्या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूंना सर्व प्रकारच्या वाहनांचे पार्किंग सक्त मनाई करण्यात आली आहे. पिंपळ कट्टा, फोर्ट रोड, मुजावर खूट, सेंट्रल बस स्टँड, मार्केट पोलीस स्टेशन क्रॉस, संगोळी रायण्णा सर्कल, डी.सी. ऑफिस गेट, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, एन.डी. खूट सिग्नल, धर्मवीर संभाजी सर्कल, फिश मार्केट, ग्लोब सर्कल ते असद खान दर्गा या मार्गावर हा नियम लागू राहील.
वाहनांसाठी पर्यायी पार्किंग व्यवस्था
वाहनधारकांसाठी खालील ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे:
- जिजामाता सर्कलजवळ भारतेश एज्युकेशन इन्स्टिट्यूटसमोरील कॅन्टोन्मेंट पार्किंग
- सरदार ग्राउंड
- महिला पोलीस ठाण्यामागील मोकळी जागा
- टिळकवाडी येथील झटपट कॉलनीजवळील मोकळी जागा
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी केले आहे.
