भाजप आमदाराच्या मुलीकडून महिला PSI ला कथित मारहाण; व्हिडिओ व्हायरल, FIR नंतरही अटक नाही

भाजप आमदाराच्या मुलीकडून महिला PSI ला कथित मारहाण; व्हिडिओ व्हायरल, FIR नंतरही अटक नाही

मंड्या : श्रीरंगपट्टण तालुक्यातील आरती उक्कड मंदिरात महिला PSI ला कथितरित्या मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. तक्रार दाखल होऊन FIR नोंदवण्यात आली असतानाही अद्याप आरोपीला अटक झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

ही घटना 12 ऑगस्ट रोजी भीमा अमावास्या उत्सवादरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष बंदोबस्तासाठी मंदिरात तैनात असलेल्या PSI सविता बी. पोलीस पाटील यांच्याशी दर्शनाला उशीर झाल्याच्या कारणावरून वाद झाल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, तुमकूर ग्रामीण मतदारसंघाचे भाजप आमदार बी. सुरेश गौडा यांची कन्या ऐश्वर्या, तसेच ACP गौतम यांच्या पत्नी असल्याचे सांगितले जाते. ऐश्वर्या यांनी PSI यांच्याशी कथितरित्या वाद घालत शिवीगाळ केली, थप्पड मारली आणि त्यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

PSI यांच्या तक्रारीवरून क्यातनहळ्ळी पोलिसांनी ऐश्वर्या यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 132, 115(2), 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, कथित मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना आणि FIR दाखल झाल्यानंतरही आरोपीच्या अटकेबाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई समोर आलेली नाही. त्यामुळे FIR नोंदवूनही अटक का झाली नाही? पोलिसांकडून पुढील कारवाई कधी होणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + 4 =

error: Content is protected !!