मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षण दिन उत्साहात साजरा

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षण दिन उत्साहात साजरा

बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या शबाना मुजावर यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी नववीतील विद्यार्थिनी हिंदवी विशाल गोवेकर हिने मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनकार्याविषयी आपले विचार व्यक्त केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या थोर नेत्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, त्यामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते प्रखर देशभक्त, थोर विद्वान, कुशल पत्रकार, उत्तम वक्ते आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते, असे तिने आपल्या मनोगतात सांगितले.

या कार्यक्रमाला शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, सांस्कृतिक विभागप्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शैक्षणिक आणि राष्ट्रीय योगदानाची माहिती देण्यात आली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 1 =

error: Content is protected !!