बेळगाव : औद्योगिक क्षेत्रात गेली ५० वर्षे दर्जेदार सेवा देत ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या देशपांडे इंडस्ट्रीज यांच्या नव्या कार्यालय व कारखाना इमारतीचा वास्तुशांती व उद्घाटन समारंभ शुक्रवारी, ४ सप्टेंबर २०२६ रोजी उद्यमबाग येथील नव्या प्रशस्त इमारतीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील व सौ. प्रीती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात उद्योजक व चित्रपट निर्माते श्रीकांत देसाई, ग्रीव्हज कॉटन लिमिटेडचे जीएम (सेल्स अँड सर्व्हिस) विजय छत्तानी तसेच एजीएम (सर्व्हिस अँड आयबी) नरसिंहराव कुलकर्णी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वैदिक मंत्रोच्चारात वास्तुशांती विधी पार पडला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी देशपांडे इंडस्ट्रीजच्या पन्नास वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करत भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार अभय पाटील यांनी देशपांडे इंडस्ट्रीजने औद्योगिक क्षेत्रात निर्माण केलेली विश्वासार्हता आणि रोजगार निर्मितीतील योगदान अधोरेखित केले. उद्योगाच्या विस्तारामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशपांडे इंडस्ट्रीज ही जनरेटरच्या विक्री, सेवा व सुटे भाग पुरवठा क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून, नव्या इमारतीमुळे ग्राहकांना अधिक दर्जेदार व जलद सेवा उपलब्ध होणार आहे. आधुनिक सुविधा, प्रशस्त कार्यालयीन व्यवस्था आणि सेवा विभागामुळे उद्योगाच्या कार्यक्षमतेत आणखी वाढ होणार असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले.
समारंभाला उद्योग क्षेत्रातील मान्यवर, ग्राहक, पुरवठादार, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
देशपांडे परिवारातील मेधा देशपांडे , भरत देशपांडे , श्रिया, योगेश आणि सान्विका यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. पन्नास वर्षांची यशस्वी परंपरा जपत नव्या जोमाने पुढील वाटचाल करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

