चन्नेवाडी गावाच्या स्वतंत्र मतदान केंद्राच्या मागणीला यश; 196A बूथला मंजुरी

चन्नेवाडी गावाच्या स्वतंत्र मतदान केंद्राच्या मागणीला यश; 196A बूथला मंजुरी

खानापूर : गेल्या 25 ते 30 वर्षांपासून चन्नेवाडी (ता. खानापूर) येथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भुत्तेवाडी येथील मतदान केंद्रावर जावे लागत होते. यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याने चन्नेवाडीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र आणि स्वतंत्र वॉर्डची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर या मागणीला यश मिळाले असून चन्नेवाडी गावासाठी 196A क्रमांकाचे स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी खानापूरचे तहसीलदार धुंडाप्पा कोमार यांना निवेदन देऊन स्वतंत्र मतदान केंद्राची मागणी केली होती. त्यानंतर चन्नेवाडीचे रहिवासी तसेच खानापूर युवा समितीचे अध्यक्ष व सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनीही या मागणीचा पाठपुरावा करत बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.

यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पुढील महिन्यात स्वतंत्र मतदान केंद्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत प्रशासनाने चन्नेवाडीसाठी 196A क्रमांकाचे स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये गावातील मतदारांना स्वतःच्या गावातील प्राथमिक शाळेतच मतदान करता येणार आहे.

या निर्णयामुळे चन्नेवाडी ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, खानापूर तालुक्याचे निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण आणि तहसीलदार धुंडाप्पा कोमार यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × one =

error: Content is protected !!