बेळगाव : राज्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील कुमार गंधर्व सभागृहात परीक्षा पूर्वतयारीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बुधवार, २२ पासून सुरू होणारी ही परीक्षा अत्यंत जबाबदारीने व गांभीर्याने पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले.
बैठकीस परीक्षा प्रमुख, जॉइंट चीफ, ऑब्झर्व्हर तसेच स्क्वॉड सदस्य उपस्थित होते. परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक बाबीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले. परीक्षा केंद्र परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याची दक्षता, विद्यार्थ्यांच्या ड्रेस कोडची तपासणी, तसेच पर्यवेक्षकांची लॉटरी पद्धतीने नियुक्ती करून बैठक व्यवस्था पारदर्शक ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी बेळगावचे डी.डी.पी.यू. एम.एम कांबळे यांनी सोप्या भाषेत परीक्षेसंदर्भातील विविध मुद्द्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना जबाबदाऱ्या अधिक स्पष्ट झाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिकोडी विभागाचे प्रभारी डी.डी.पी.यू. कोळी यांनी केले. कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस अधिकारी अग्नी , बी.ई.ओ. तसेच डायट कार्यालयाचे अधिकारी बजंत्री उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राचार्य यांनी केले.
यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक यशस्वीपणे पार पडली असून आगामी सीईटी परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे स्पष्ट झाले.
