बेळगाव : जगद्गुरु यांची जयंती यंदा मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय बसवेश्वर बँकेत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बसवेश्वर बँकेचे अध्यक्ष यांनी प्रास्ताविक करत बसवेश्वरांनी दिलेला समानता, सत्य, अहिंसा आणि “कायकವೇ कैलास” या तत्वांचा संदेश जनमानसात पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली. हाच जयंती साजरी करण्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उत्सवानिमित्त रविवार, 19 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता हिंदवाडी येथील बसवेश्वर सर्कलपासून रामतीर्थ नगरपर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. तसेच रविवार, 26 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथून बसवन्ना यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून ती शहरातील विविध भागातून फिरणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये बंधू-भगिनी, बसवभक्त, युवक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बैठकीस प्रकाश बाळेकुंद्री, रमेश सिद्धनावर, गिरीश बागी, सतीश पाटील, जगदीश खडबडी, श्रीमती सरला हेरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
