बेळगाव : बेळगावने देशाला तीन ऑलिम्पिक हॉकीपटू दिले आहेत. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटरनेही हॉकी खेळाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. हॉकी हा खेळ खेळाडूंना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवतो. त्यामुळे पुढील ऑलिम्पिक स्पर्धांसाठी हॉकीपटूंनी आतापासूनच जय्यत तयारी करावी, असे प्रतिपादन मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटरचे ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांनी केले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचे कौतुक करताना, “आजच्या हॉकी स्पर्धा पाहून माझे मन भरून आले,” असे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुळाप्पा होसमनी होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर वेदांत सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सायनेकर, जिल्हा युवजन खात्याचे बी. श्रीनिवास, उपाध्यक्ष पूजा जाधव, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर, सचिव सुधाकर चाळके, मनोहर पाटील, नामदेव सावंत, उत्तम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष श्रीकांत आजगांवकर, सागर पाटील, कपिल भोसले, गोपाळ खांडे, संपत पाटील, संदीप पाटील, सुरेश पोटे, स्वानंद गोडबोले, रमाकांत कारेकर, शांताप्पा नरगोडी, डॉ. गिरीश माने, प्रशांत मंकाळे, चेतन दोडमणी यांच्यासह डिपार्टमेंट ऑफ यूथ एम्पॉवरमेंट अँड स्पोर्ट्सतर्फे बसवराज जकन्नावर, जयवंत खन्नूकर, कृष्णा सायनेकर, प्रकाश चाळके, दत्तात्रय जाधव, डॉ. रामकृष्ण एन., आनंद रत्नपगोळ, विकास कलगटगी, विनोद पाटील, आनंद आपटेकर तसेच सविता सायनेकर, अश्विनी केसरकर, इशा चव्हाण, आशा होसमनी, सविता वेसणे, सुप्रिया कारेकर, अश्विनी बस्तवाडकर, अश्विनी पाटील व अश्विनी डुकरे आदी उपस्थित होते.
हॉकी स्पर्धांचे अंतिम निकाल
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या स्पर्धांमध्ये आंतरशालेय गटाच्या अंतिम सामन्यात ताराराणी हायस्कूलने भंडारी हायस्कूलचा 4-1 अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले.
आंतरमहाविद्यालयीन मुलींच्या गटात मुडलगी बी.पी.एड. महाविद्यालयाने आरपीडी महाविद्यालयावर सडन डेथमध्ये मात करत विजेतेपद मिळविले.
तर आंतरमहाविद्यालयीन मुलांच्या गटात व्हीटीयू महाविद्यालयाने आरपीडी महाविद्यालयाचा 3-1 अशा फरकाने पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक, पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या स्पर्धांना खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या हॉकी स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागण्यास मदत झाली.
