मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा

मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा

बेळगाव : भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्ट रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील उपस्थित होते. त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमात इयत्ता पाचवीतील विद्यार्थी विक्रांत गुरव याने राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यामागील उद्देश तसेच मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची माहिती उपस्थितांना दिली. देशातील उत्कृष्ट खेळाडूंना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणाऱ्या ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ाची माहितीही यावेळी देण्यात आली.

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शाळेत तालुकास्तरासाठी निवड झालेल्या खो-खो संघाचा, एक्सलंट ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच बालकवी संमेलनात कविता सादर करून कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, शाळेचे क्रीडामंत्री साईराज पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × four =

error: Content is protected !!