खा. इराण्णा कडाडी यांच्या निधीतून बी. के. मॉडेल हायस्कूलला अत्याधुनिक स्मार्ट बोर्डची भेट

खा. इराण्णा कडाडी यांच्या निधीतून बी. के. मॉडेल हायस्कूलला अत्याधुनिक स्मार्ट बोर्डची भेट

बेळगाव, दि. 11 जुलै : बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्त बी. के. मॉडेल हायस्कूलला माजी खासदार इराण्णा कडाडी यांच्या निधीतून अत्याधुनिक स्मार्ट बोर्ड भेट देण्यात आला. या स्मार्ट बोर्डच्या उद्घाटनाचा कार्यक्रम गुरुवारी उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. मराठा लाईट इन्फंट्रीचे डेप्युटी कमांडंट कर्नल विनोद पाटील यांच्या हस्ते स्मार्ट बोर्डचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव एस. एन. शिवणगी, संयुक्त सचिव अरविंद हुनगुंद, बी. के. मॉडेल हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एन. जोशी, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका डॉ. सुचेता कुलकर्णी, उषाताई गोगटे शाळेचे मुख्याध्यापक एम. के. मादर, रवी घाटगे, शिक्षकवृंद तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्याध्यापिका डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी इंग्रजी माध्यम शाळेची प्रगती, दूरदृष्टी आणि शैक्षणिक गुणवत्तेबाबत सविस्तर माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात वाढत असून, स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अध्यापन अधिक प्रभावी, आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

शाळेच्या शताब्दी वर्षात मिळालेली ही अत्याधुनिक भेट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 5 =

error: Content is protected !!