दोन सुवर्णपदक विजेत्या दिव्यांग जलतरणपटू आरोही सुरतेकरचा बेळगावात सत्कार

दोन सुवर्णपदक विजेत्या दिव्यांग जलतरणपटू आरोही सुरतेकरचा बेळगावात सत्कार

बेळगाव : बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल हेड स्विमिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या दिव्यांग जलतरणपटू आरोही सुरतेकर हिचा डॉल्फिन स्विमर्स ग्रुप, बेळगाव आणि आबा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला.

यावेळी आरोहीला रोख रक्कम व मिठाई देऊन तिच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला. गेली तीन वर्षे ती गोवा वेस स्विमिंग क्लबमध्ये नियमित सराव करत असून प्रतिकूल परिस्थितीतही तिने मिळवलेले यश प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी सांगितले. तसेच तिच्या भावी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

सत्कार समारंभास महादेव केसरकर, विनायक आर्कसाळी, गजानन शिंदे, मुकेश शिंदे, प्रशांत कांबळे, राजू पुजारी, राजू पाटील, सुनील मुरकुटे, बाबू कांबळे, उमेश कांबळे, गजू पाटील, प्रदीप पाटणकर, सुहास निंबाळकर, हरीश वाच्छानी, महांतेश नवलगुंद, सतीश ओमकार, सुरेश बडस, अशोक पाटील यांच्यासह डॉल्फिन स्विमर्स ग्रुप आणि आबा क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.

यावेळी विश्वास पवार यांनी आरोहीला बहुमोल मार्गदर्शन करत तिच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या. उपस्थितांनी आरोहीच्या जिद्दीचे आणि कर्तृत्वाचे कौतुक करत तिच्या भविष्यातील यशासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × five =

error: Content is protected !!