राज्य रँकिंग स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सची चमकदार कामगिरी; ९ पदकांची कमाई

राज्य रँकिंग स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सची चमकदार कामगिरी; ९ पदकांची कमाई

बेळगाव : बंगळूर आणि तुमकुर येथे आयोजित राज्यस्तरीय खुल्या रँकिंग स्केटिंग स्पर्धा २०२६ मध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी दमदार कामगिरी करत तब्बल ७ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदकांसह एकूण ९ पदकांची कमाई केली.

या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून २०० हून अधिक अव्वल स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. त्यात बेळगावच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

पदक विजेते स्केटर्स

  • हिरेन राज – १ सुवर्ण, १ कांस्य
  • मनन अंबिगा – १ कांस्य
  • रश्मीता अंबिगा – २ सुवर्ण
  • जय ध्यान राज – १ सुवर्ण, १ रौप्य
  • साईराज मेंडके – २ सुवर्ण
  • अवनीश कोरीशेट्टी – १ सुवर्ण

या सर्व खेळाडूंनी केएलई सोसायटी स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे नियमित सराव केला आहे. प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येळ्ळूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.

स्केटर्सना पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर तसेच कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव इंदुधर सीताराम यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या या यशामुळे बेळगावच्या स्केटिंग क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असून, आगामी स्पर्धांमध्येही हे खेळाडू अशीच चमकदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten + fifteen =

error: Content is protected !!