राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत खुशी आणि अन्वीची चमकदार कामगिरी 🥈

राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत खुशी आणि अन्वीची चमकदार कामगिरी 🥈

बंगळुरू येथे झालेल्या रोलर डर्बी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या खुशी घोटीवरेकर आणि अन्वी सोनार यांनी प्रत्येकी रौप्यपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेत २०० हून अधिक स्केटर्सनी सहभाग घेतला होता.

दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव इंदुधर सीताराम आणि पालकांचे प्रोत्साहन मिळत आहे.

खुशी व अन्वीच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 🏆👏

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − 6 =

error: Content is protected !!