बेळगाव : विद्या भारती कर्नाटक–बेळगाव जिल्ह्याच्या वतीने आयोजित राज्य/विभागीय स्तरावरील फुटबॉल व हँडबॉल स्पर्धेचे उद्घाटन भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी युवा खेळाडूंना शुभेच्छा देताना जाधव म्हणाले की, युवा खेळाडूंच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे आहे. खेळ हा केवळ विजय-पराजयापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सांघिक भावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले.
स्पर्धेत सहभागी सर्व संघ व खेळाडूंना शुभेच्छा देत, बेळगावच्या युवा क्रीडा प्रतिभांनी भविष्यात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला ओंकार देसाई, राजेंद्र भाटकंडे, सुजाता मॅडम, एस. व्ही. कुलकर्णी, आर. के. कुलकर्णी, पुनेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
