बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे ओम नगर येथील शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या स्केटिंग ट्रॅकवर आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्हाभरातील विविध भागांतून आलेल्या 150 हून अधिक अव्वल स्केटर्सनी स्पर्धेत सहभाग घेत आपल्या वेग, संतुलन आणि कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभ शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्षा ज्योती चिंडक आणि समाजसेवक अशोक गोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी स्केटिंगपटू, प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान ट्रॅकवर रंगलेली चुरशीची लढत उपस्थितांसाठी आकर्षण ठरली. विजेत्या खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विविध वयोगटांमध्ये अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. 6 वर्षाखालील मुलांच्या गटात मारी याने 3 सुवर्ण पदके जिंकत आपला दबदबा निर्माण केला, तर केदार याने 3 रौप्य पदके मिळवली. 6 वर्षाखालील मुलींच्या गटात अध्या उपार हिने 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक पटकावले. सौम्या हिने 1 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके, तर अंजली हिने 3 कांस्य पदके मिळवली.
6 ते 8 वर्षांच्या मुलांच्या गटात इशन प्रभाकर याने 3 सुवर्ण पदकांची कमाई केली. पियूष याने 1 रौप्य आणि 2 कांस्य, तर तन्मय याने 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकले. मुलींच्या गटात प्रणिता मोटेकर हिने 3 सुवर्ण पदके मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. रीवा नाईक हिने 2 रौप्य आणि 1 कांस्य, तर धृती हिने 1 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली.
8 ते 10 वर्षांच्या मुलांच्या गटात दियान पोरवाल याने 3 सुवर्ण पदके पटकावत चमकदार कामगिरी केली. प्रीतम बागेवाडी याने 3 रौप्य पदके मिळवली. मुलींच्या गटात अलिजा हिने 3 सुवर्ण, अद्या हिने 3 रौप्य, तर स्वराली हिने 3 कांस्य पदके जिंकली.
10 ते 12 वर्षांच्या मुलांच्या गटात आर्यन गवंडी याने 3 सुवर्ण पदके मिळवली. राजवीर कदम याने 3 रौप्य, तर अर्षमान याने 2 रौप्य पदके जिंकली. मुलींच्या गटात दुर्वा पाटील हिने 3 सुवर्ण पदके पटकावली. अँजेला हिने 3 रौप्य, तर युक्ता हिने 3 कांस्य पदके मिळवली.
12 ते 15 वर्षांच्या मुलांच्या गटात सर्वेश पाटील याने 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके जिंकली. कुलदीप बिर्जे याने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य, तर सूफीयान याने 3 कांस्य पदके मिळवली. मुलींच्या गटात प्रांजल पाटील हिने 3 सुवर्ण पदके पटकावली. अन्या हिने 1 रौप्य आणि 2 कांस्य, तर इलोरा हिने 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकले.
15 ते 18 वर्षांच्या मुलांच्या गटात अचकित याने 3 सुवर्ण पदके जिंकत वर्चस्व गाजवले. विवेक याने 3 रौप्य, तर प्रज्वल याने 3 कांस्य पदके मिळवली. मुलींच्या गटात जानवी तेंडूलकर हिने 3 सुवर्ण पदके जिंकत विशेष लक्ष वेधले.
इनलाईन स्केटिंग स्पर्धेतही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. 6 वर्षाखालील गटात मानवीत याने 3 सुवर्ण पदके मिळवली. 6 ते 8 वर्षांच्या मुलांच्या गटात एडविन याने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य, तर अंशराज याने 1 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके जिंकली. मुलींच्या गटात अदिती हिने 3 सुवर्ण आणि साबिया हिने 3 रौप्य पदके मिळवली.
8 ते 10 वर्षांच्या मुलांच्या गटात सामांग याने 3 सुवर्ण पदके पटकावली. अविनाश पाटील याने 3 रौप्य, तर आयुष याने 3 कांस्य पदके मिळवली. 10 ते 12 वर्षांच्या मुलींच्या गटात अबिरेल हिने 3 सुवर्ण, अमिषा वेर्णेकर हिने 3 रौप्य, तर राही जितकर हिने 3 कांस्य पदके जिंकली.
12 ते 15 वर्षांच्या मुलांच्या गटात आरशान माडीवाले याने तब्बल 13 सुवर्ण पदके जिंकून स्पर्धेतील सर्वात उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात जोए हिने 3 सुवर्ण, तर अबेका हिने 3 रौप्य पदके मिळवली. 15 ते 18 वर्षांच्या मुलांच्या गटात शल्य तरळेकर याने 3 सुवर्ण, तर श्रेयश वजंत्री याने 3 रौप्य पदके जिंकली.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, ऋषिकेश पसारे, विशाल वेसने, सतीश शेटे, विनायक पाटील आणि सोहम हिंडलगेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेमुळे जिल्ह्यातील स्केटिंग खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची उत्तम संधी मिळाल्याची भावना पालक आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केली.
