अमरनाथ यात्रेसाठी बेळगावातून भाविक रवाना; कपिलेश्वर मंदिरातर्फे भगव्या उपरण्यांचे वितरण

अमरनाथ यात्रेसाठी बेळगावातून भाविक रवाना; कपिलेश्वर मंदिरातर्फे भगव्या उपरण्यांचे वितरण

बेळगाव :
दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव शहरातून पवित्र अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा जत्था उत्साहपूर्ण वातावरणात रवाना झाला. गेल्या २६ वर्षांपासून सोमनाथ हलगेकर व अमित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अमरनाथ यात्रेचे यशस्वी आयोजन करण्यात येत असून, यंदाही अमरनाथ यात्रेसह बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री आणि पंचकेदार यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.

यावर्षीही गतवर्षाप्रमाणे कपिलेश्वर मंदिराचे सेवेकरी या पवित्र यात्रेत सहभागी झाले आहेत. यात्रेला निघालेल्या सर्व भाविकांना शुभेच्छा देत कपिलेश्वर मंदिराच्या वतीने भगवे उपरणे भेटस्वरूपात प्रदान करण्यात आले. धार्मिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात यात्रेकरूंना सुखरूप व मंगलमय यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी कपिलेश्वर मंदिर ट्रस्टचे अभिजीत चव्हाण, प्रसाद बाचुळकर, नागराज कट्टी, महेश सांबरेकर, रणजीत जाधव, राघवेंद्र उरणकर, विनायक मनुगतकर यांच्यासह अन्य ट्रस्टी, सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × two =

error: Content is protected !!