राहुल गांधी यांच्या दिवाळी स्नेहमेळाव्याला डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची उपस्थिती!

राहुल गांधी यांच्या दिवाळी स्नेहमेळाव्याला डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची उपस्थिती!

दिल्ली येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट; पक्षातील नेत्यांसोबत दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण

खानापूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. राहुल गांधी यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी दिवाळी सणानिमित्त विशेष स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते.

खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनाही राहुल गांधी यांच्याकडून या विशेष कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी दिल्ली येथे उपस्थित राहून या दिवाळी स्नेहमेळाव्यात सहभाग घेतला.

यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत सणाचा आनंद साजरा केला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या या भेटीगाठींमुळे स्नेहमेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या कार्यक्रमातील डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची उपस्थिती खानापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen + 10 =

error: Content is protected !!