हनुमान नगर कॅफे हल्ला प्रकरणातील दोन मुख्य आरोपी अटकेत

हनुमान नगर कॅफे हल्ला प्रकरणातील दोन मुख्य आरोपी अटकेत

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगावच्या हनुमान नगर येथील कॅफेमध्ये १५ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री घडलेल्या हल्ला प्रकरणात एपीएमसी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू असून, घटनेत सहभागी असलेल्या इतर आरोपींनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सामी सखिल तहशिलदार (वय २३, रा. शाहूनगर, बेळगाव) आणि अरमान मल्लिकजान नदाफ (वय २०, रा. संगमेश्वर नगर, बेळगाव) अशी आहेत.

हनुमान नगर येथील कॅफेमध्ये मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + 17 =

error: Content is protected !!