संगोळी रायण्णा महाविद्यालयाच्या पुरुष हॉकी संघाला तृतीय स्थान; सहा खेळाडूंची युनिव्हर्सिटी ब्लूसाठी निवड

संगोळी रायण्णा महाविद्यालयाच्या पुरुष हॉकी संघाला तृतीय स्थान; सहा खेळाडूंची युनिव्हर्सिटी ब्लूसाठी निवड

बेळगाव : प्रतिनिधी

कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आंतरमहाविद्यालयीन हॉकी (पुरुष व महिला) स्पर्धेत संगोळी रायण्णा प्रथम श्रेणी घटक महाविद्यालयाच्या पुरुष हॉकी संघाने तृतीय स्थान पटकाविले. तसेच महाविद्यालयातील सहा खेळाडूंची युनिव्हर्सिटी ब्लू संघासाठी निवड झाली आहे.

८ ऑक्टोबर २०२६ रोजी बेळगाव येथील सुभाषचंद्र बोस मैदान (लेले मैदान) येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संगोळी रायण्णा प्रथम श्रेणी घटक महाविद्यालयाने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांच्या संघांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.

या चुरशीच्या स्पर्धेत संगोळी रायण्णा महाविद्यालयाच्या पुरुष हॉकी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय निधी पाटील, सृष्टी शेट्टी, संजोटा चौगुले, प्रज्वला बेलवी, रोशन पाटील आणि आकाश या सहा खेळाडूंची युनिव्हर्सिटी ब्लू संघासाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. सी. पाटील, उपप्राचार्य प्रा. अर्जुन जांबगी, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. करुणा अमरुस्कर, डॉ. गिरिजाशंकर माने तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारीवर्गाने यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

प्राचार्यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक करून खेळाडूंना भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात भर पडली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 − 2 =

error: Content is protected !!