खानापूर तालुक्याला मिळाले ४५ ज्युनियर पॉवरमन; माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

खानापूर तालुक्याला मिळाले ४५ ज्युनियर पॉवरमन; माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

खानापूर : तालुक्यातील हेस्कॉममध्ये लाईनमनची कमतरता असल्याने नागरिकांना व कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्येची दखल घेत खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी तातडीने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून तालुक्याला ४५ ज्युनियर पॉवरमन (लाईनमन) मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यातील हेस्कॉमचे कर्मचारी रायगड येथे डॉ. निंबाळकर यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी तालुक्यात लाईनमनची मोठी कमतरता असून तब्बल ४३ लाईनमनची आवश्यकता असल्याचे कर्मचाऱ्यांनी ताईंना सांगितले.

या समस्येची तातडीने दखल घेत डॉ. निंबाळकर यांनी हेस्कॉमच्या एमडी वैशाली मॅडम यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच पॉवर मिनिस्टर यांच्याशीही संपर्क साधला. सुरुवातीला मंत्री महोदयांचा फोन उपलब्ध झाला नाही; मात्र सुमारे २०-२५ मिनिटांनी त्यांचा परतीचा फोन आला. त्यावेळी डॉ. निंबाळकर यांनी खानापूर तालुक्यातील लाईनमनच्या कमतरतेचा मुद्दा मांडत एमडींशी याबाबत चर्चा करण्याची विनंती केली.

यानंतर खानापूर तालुक्याला ४५ ज्युनियर पॉवरमन उपलब्ध करून देण्यात आले.

ही आनंदाची बातमी हेस्कॉम कर्मचारी संतोष यांनी सांगितली असून, या कामासाठी डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे आभार मानण्यासाठी त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ताई खानापूरला आल्यानंतर त्यांची भेट घेणार असल्याचेही कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 + three =

error: Content is protected !!