बेळगाव, दि. १२ सप्टेंबर : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आरती संग्रहाचे प्रकाशन व मोफत वितरण उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमात समितीचे नेते नेताजी जाधव, सार्वजनिक गणेश महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, जत्तीमठाचे सरपंच दत्ता जाधव, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, समितीचे नेते महादेव पाटील, शिवाजी हावळानाचे, राजकुमार बोकडे यांच्या उपस्थितीत आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गणेशोत्सवाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व तसेच आरती संग्रहाच्या उपक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित भाविक व नागरिकांना आरती संग्रहाचे मोफत वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभिजित मजुकर व सुनील बोकडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास राकेश सावंत, यल्लापा मन्नोळकर, हेमंत शिंदे, देवाप्पा शहापूरकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रणजीत हावळानाचे यांनी केले.
