संगीत भजन स्पर्धेत वाल्मिकी भजनी मंडळ कुद्रेमानीला चतुर्थ क्रमांक

संगीत भजन स्पर्धेत वाल्मिकी भजनी मंडळ कुद्रेमानीला चतुर्थ क्रमांक

हत्तरगी : प्रतिनिधी

गोकुळ अष्टमीनिमित्त हत्तरगी (ता. हुक्केरी) येथील श्री हरी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या संगीत भजन स्पर्धेत कुद्रेमानी येथील वाल्मिकी भजनी मंडळाने उत्कृष्ट सादरीकरण करत चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत वाल्मिकी भजनी मंडळाने सुमधुर गायन आणि सुरेल भजन सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. मंडळाला मिळालेले पारितोषिक सुप्रसिद्ध गायिका सौ. मंजुश्री कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मंडळाच्या सदस्यांनी पारितोषिक स्वीकारले.

या यशामागे मंडळाचे गुरुजी ह.भ.प. नंदू केसरकर महाराज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळातील सदस्य सातत्याने भजनाची साधना करत असून, संगीत आणि भक्तीचा सुंदर संगम साधत आहेत.

वाल्मिकी भजनी मंडळामध्ये जोतिबा बडसकर, महादेव हेमाणा तरवाळ, सुभाणा वैजू तरवाळ, नामदेव मल्लाप्पा कांबळे, श्रीमंता रा. नाईक, सौ. शांता ता. तरवाळ आणि सौ. ललिता प. तरवाळ यांचा सहभाग आहे.

मंडळाच्या उपक्रमाला राजेंद्र पाटील, मारुती भ. तरवाळ, परशराम तरवाळ, यलापा तरवाळ, मैलापा तरवाळ आणि तानाजी तरवाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

वाल्मिकी भजनी मंडळाने यापूर्वीही विविध भजन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अनेक बक्षिसे मिळविली आहेत. या यशाबद्दल कुद्रेमानी परिसरातून मंडळाचे अभिनंदन होत असून, भक्ती, संगीत आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + ten =

error: Content is protected !!