बेळगाव : भाग्यनगर परिसरात ‘हमारा देश संघटना’च्या वतीने भगवा ध्वज फडकावण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हिंदू धर्माचे प्रतीक मानला जाणारा भगवा ध्वज सौ. विशाखा ओझा यांच्या निवासस्थानी विधिवत फडकावण्यात आला.
यावेळी परिसराचे नगरसेवक अभिजीत जवळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला ‘हमारा देश संघटना’चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भगवा ध्वज हा एकता, त्याग आणि हिंदू संस्कृतीच्या शाश्वत शक्तीचे प्रतीक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. समाजाला आपल्या संस्कृतीशी जोडण्याचा आणि एकजूट वाढवण्याचा हा छोटा पण महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
