बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेली 21 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा नुकतीच ओम नगर येथील शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या स्केटिंग रिंकवर उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील विविध भागांतील स्केटर्सनी स्पर्धेत सहभाग घेत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले.
स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाला समाजसेवक अशोक घागवे आणि कल्लाप्पा शहापूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येळ्ळूरकर यांच्यासह बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक, स्केटर्स आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेत प्रणिश्मिता वाडकेरी, विहा पालनकुडे, विघ्नेश गोटे, प्रणव जाधव, शिवकन्या पाटील, पलक पट्टणकुड, हर्षवर्धन दड्डीकेरी, तश्वी कुलकर्णी, तन्वी कलकुंद्रीकर, समृद्ध बानी, हृवन उमराणी, जितेश बेनल्ली, सोहनी चौगुले, आरुष बोरगल्ली, प्रणव माळी, सिया चौगुले, सौरभ साळोखे, जान्हवी तेंडुलकर, आर्या कदम, आरोही महारनूर, धैर्यशील, दीनवा पाटील, प्रीतम बागेवाडी, सावी, विराज सुनवे, रोहन बागवान, आलेया उप्पर, सोमराणी, शल्या तारळेकर, ब्लॉसम रॉड्रिग्स, तन्वी मोहिते, इथन रॅमंडिस, जानवी दुधाळ, विश्वतेज पवार, आरशान माडीवाले, भाग्यराज पाटील यांच्यासह अनेक स्केटर्सनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई करत उल्लेखनीय यश संपादन केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षक योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, कृष्ण कन्हैया होसमानी, ऋषिकेश पसारे, सोहम हिंडलगेकर, अजित शिलेदार, सुरज शिंदे, आशुतोष, दृष्टी कुडाळे तसेच इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
जिल्ह्यातील स्केटिंग खेळाला प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींसाठी उत्साहवर्धक ठरली.
