मराठी विद्यानिकेतनमध्ये उत्साहात शिक्षक दिन साजरा

मराठी विद्यानिकेतनमध्ये उत्साहात शिक्षक दिन साजरा

बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षिका रोहिणी सावंत यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर इयत्ता तिसरी ‘अ’च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका मुक्ता आलगोंडी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्ञानाचे भांडार’ ही कविता सादर केली. तसेच विद्यार्थी अनय जोतिबा खन्नूकर याने शिक्षक दिनाचे महत्त्व विषद करणारे मनोगत व्यक्त केले.

इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी आकर्षक भित्तीपत्रके तयार करून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडविले. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षकाची भूमिका पार पाडत अध्यापनाचा अनुभव घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धतीची जवळून ओळख झाली.

या निमित्ताने शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलन आणि बौद्धिक खेळांच्या गटकार्यक्रमांमुळे शाळेतील वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले. शिक्षकांनीही विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत शिक्षक दिनाचा आनंद द्विगुणित केला.

यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांनी शिक्षकांचे समाज आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेले योगदान अधोरेखित करत शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, समन्वयक नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + 8 =

error: Content is protected !!