छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मराठा व्यवसाय संघाकडून शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मराठा व्यवसाय संघाकडून शिवजयंती उत्साहात साजरी

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे मराठा व्यवसाय संघ भारत, बेळगाव विभाग यांच्या वतीने परंपरेनुसार शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास संघटनेच्या सर्व ॲडमिन टीमची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व प्रेरणादायी मंत्र पठणाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी शिवरायांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन मराठा व्यावसायिक समाजासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one + eleven =

error: Content is protected !!