शिवजयंती मिरवणुकीत दुचाकींसाठी मोफत सेवा; मेकॅनिक असोसिएशनचा पुढाकार

शिवजयंती मिरवणुकीत दुचाकींसाठी मोफत सेवा; मेकॅनिक असोसिएशनचा पुढाकार

बेळगाव : शिवजयंती उत्सव मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने शिवभक्त बेळगावात दाखल होतात. या दरम्यान अनेकांच्या दुचाकी नादुरुस्त होऊन अडचणी निर्माण होत असल्याची बाब मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्या निदर्शनास आली होती.

या पार्श्वभूमीवर महामंडळाचे उपाध्यक्ष गणेश दड्डीकर यांनी बेळगाव स्कूटर आणि मोटार मेकॅनिक ओनर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत बैठक घेतली. बैठकीत मिरवणुकीदरम्यान शहरात कुठेही दुचाकी बिघडल्यास तत्काळ विनामूल्य सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मिरवणुकीच्या काळात असोसिएशनचे सर्व पदाधिकारी धर्मवीर संभाजी चौक येथे सेवेसाठी उपस्थित राहणार असून, गरजू शिवभक्तांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या सेवेसाठी अध्यक्ष विजयकुमार निंबरगीकर (8951134277), उपाध्यक्ष राजू रेडेकर (9902382345) तसेच पदाधिकारी महेश काकतीकर (9242133283), अमोल यल्लूपाचे (9738501683), गिरीश नाईक (पिल्लू मेस्त्री) (9945866946), सागर तिवारी (9632605327), विजय शिंदे (9341493170) आणि प्रवीण ताशिलदार (9916610143) हे उपलब्ध राहणार आहेत.

या उपक्रमामुळे शिवजयंती मिरवणुकीसाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. 🚩

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + 17 =

error: Content is protected !!