बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव
शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी करून पोलिसांनी तीन मोटारसायकली जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे ९५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १२७/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अंतर्गत प्रकरणाचा तपास सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.
१० सप्टेंबर २०२६ रोजी बेळगाव शहरातील शहापूर परिसरातील बसवेश्वर सर्कल, खासबागजवळ संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या बसवराज निंगप्पा अण्णेगोजी, रा. मराठा गल्ली, चिक्क मुनवळ्ळी, ता. खानापूर, जि. बेळगाव याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. तपासादरम्यान त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई बेळगाव शहर पोलिस आयुक्त, उपपोलिस आयुक्त तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या तपास पथकात शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धप्पा एस. सिवमणी, पीएसआय होन्नप्पा तळवार, पीएसआय एन. एस. बसवा यांच्यासह जी. आर. शिरसंगी, एस. एम. गुडदेईगोळ, अजित शिपूरे, शिवराज पच्छन्नवर, हणमंत विभूती, आनंद खोत, श्रीरंग भस्मे आणि सतीश गिरी यांनी सहभाग घेतला.
पोलिस आयुक्तांनी तपास पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
