शहापूर पोलिसांची मोठी कारवाई; 15.73 लाखांचे 103.97 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

शहापूर पोलिसांची मोठी कारवाई; 15.73 लाखांचे 103.97 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

बेळगाव, दि. ५ : शहापूर पोलिसांनी विश्वासघाताच्या गुन्ह्यात मोठी कारवाई करत 15 लाख 73 हजार 370 रुपये किमतीचे 103.97 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले सर्व सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 63/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 316(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने दुरुस्ती व इतर कामासाठी दिलेले सोन्याचे दागिने परत न करता त्यांचा अपहार केल्याची तक्रार दाखल झाली होती.

या प्रकरणी कृष्णा मोहन मैती (वय 36), मूळ रा. विजयवाडा, आंध्र प्रदेश, सध्या शहापूर, बेळगाव येथे वास्तव्यास असलेल्या संशयितास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून 103.97 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. जप्त सोन्याची अंदाजे किंमत 15.73 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मणिकांत पुजारी, महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एन. बसवा तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

या यशस्वी कामगिरीबद्दल संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 4 =

error: Content is protected !!