पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांना विशेष निमंत्रण; कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ग्वाही
बेळगाव : शाहपूर येथील बाल गणेश मंडळ, नार्वेकर गल्ली यांच्या वतीने रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी भव्य गणहोम, श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता भव्य गणहोमाने होणार असून, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमासाठी बेळगावचे नवनियुक्त पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांना मंडळाच्या वतीने विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेश महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख (PRO) विकास कलघटगी, बाल गणेश मंडळाचे उत्सव अध्यक्ष सागर पाटील आणि ‘हॉकी बेळगाव’चे सेक्रेटरी सुधाकर चाळके यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निमंत्रण सुपूर्द केले.
यावेळी पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी निमंत्रणाचा स्वीकार करत कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेण्याची ग्वाही दिली.
मंडळाच्या वतीने सर्व गणेशभक्तांनी या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
