गणेशभक्तांच्या सेवेसाठी बेळगाव स्कूटर आणि मोटरसायकल मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनचा उपक्रम; सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांचा पुढाकार
बेळगाव : गणेशोत्सवाच्या काळात शहरात विविध भागांतून मोठ्या संख्येने गणेशभक्त दाखल होत असतात. या काळात एखाद्या गणेशभक्ताची दुचाकी अचानक नादुरुस्त झाल्यास त्याला तातडीने मदत मिळावी, यासाठी बेळगाव स्कूटर आणि मोटरसायकल मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने विनामूल्य दुचाकी दुरुस्ती सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी पुढाकार घेतला असून, शहरातील विविध विभागांमध्ये मेकॅनिक बांधवांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुचाकीमध्ये बिघाड झाल्यास संबंधित विभागातील अधिकृत संपर्क क्रमांकावर फोन केल्यानंतर उपलब्ध मेकॅनिक घटनास्थळी जाऊन आवश्यक ती मदत करतील.
या उपक्रमासाठी अध्यक्ष विजयकुमार निंबरगीकर, उपाध्यक्ष राजू रेडेकर, सचिव मारुती गुरव, खजिनदार महेश काकतीकर, संचालक विजय शिंदे आणि संचालक गिरीश नाईक (पिल्लू मिस्त्री) यांच्यासह अनेक मेकॅनिक सहभागी झाले आहेत.
विभागनिहाय अधिकृत संपर्क
विभाग 1 – धर्मवीर संभाजी चौक
बाबू कडमोली – 9945010431
दत्ता पाटील – 9449201655
विभाग 2 – वडगाव, सोनार गल्ली कॉर्नर, मुख्य रस्ता
निलेश चलगुडकर – 9844314877
प्रमोद कंगराळकर – 9036333388
मारुती वि. गुरव – 9844483388
विभाग 3 – गोवावेस सर्कल, अनुग्रह हॉटेलजवळ
गिरीश नाईक (पिल्लू मिस्त्री) – 9945666946
महेश काकतीकर – 9242133283
विजय शिंदे – 9341493170
विभाग 4 – फोर्ट रोड विभाग, विजय ऑटो गॅरेज
विजयकुमार निंबरगीकर – 8951134277
राजू रेडेकर – 9902382345
विभाग 5 – टिळक चौक, अनुपम हॉटेलजवळ
सचिन गवळी – 9972794053
रवी कढहट्टी – 9880737184
एकाच वेळी सर्व मेकॅनिकना फोन न करण्याचे आवाहन
सेवा अधिक जलद आणि नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध व्हावी, यासाठी गणेशभक्तांनी दुचाकी नादुरुस्त झाल्यानंतर संबंधित विभागातील कोणत्याही एका अधिकृत संपर्क क्रमांकावर प्रथम फोन करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विभागातील सर्व मेकॅनिकना स्वतंत्रपणे फोन केल्यास अनावश्यक गोंधळ निर्माण होऊन उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विभागप्रमुख संबंधित ठिकाणच्या उपलब्ध मेकॅनिकशी संपर्क साधून गणेशभक्ताला आवश्यक ती मदत पोहोचवतील.
गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांना प्रवासादरम्यान दुचाकीच्या बिघाडामुळे अडचण निर्माण होऊ नये आणि वेळेत मदत मिळावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
“आपली अडचण — आमची जबाबदारी!” या भावनेतून मेकॅनिक बांधव गणेशभक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत.
