ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्याकिरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. यावेळी कार्यवाह सुरेंद्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात किशोर काकडे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुणिमा सिन्हा यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे प्रभावी कथन केले. रेल्वेतून फेकले गेल्यानंतरही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर देशासमोर आदर्श निर्माण केला, याचे प्रेरणादायी विवेचन त्यांनी केले. त्यांच्या कथनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाची सुरुवात पांडुरंग कारकल यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर रविंद्रनाथ जुवळी, स्नेहलता जुवळी, अश्विनी पाटील, नारायण कोरडे, सुरेंद्र देसाई, योगिनी देसाई, अशोक कदम, विजय वाईगडे, सतीश देशपांडे, औदुंबर शेट्ये, हरेश जाधव, अरविंद मुतकेकर, अशोक लोकूर, अरुण धोत्रे, श्रेयस चौगुले, वनिता जोशी, सोनिया सरोदे आणि शोभा हतरकी यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या शेवटी विठ्ठल पोळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. ज्ञानवर्धक व्याख्यान आणि संगीताच्या सुरेल मैफलीमुळे ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 3 =

error: Content is protected !!