आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ओझोन दिन उत्साहात

आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ओझोन दिन उत्साहात

बेळगाव : एसकेई सोसायटीच्या आर.पी.डी. पदवीपूर्व महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेच्या भूगोल विभागाच्या वतीने १६ सप्टेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. कीर्ती फडके यांनी ओझोन थराचे महत्त्व स्पष्ट करताना, ओझोन थर हा पृथ्वीभोवती असलेला वातावरणातील महत्त्वाचा संरक्षक कवच असून सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे संरक्षण करण्याचे कार्य करतो, असे सांगितले. त्यामुळे ओझोन थराचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

प्रा. मंजुनाथ दोडमणी यांनी ओझोन थराच्या ऱ्हासाची कारणे, त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम आणि ओझोन संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर प्राचार्या तृप्ती शिंदे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. भूगोल विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 4 =

error: Content is protected !!