रणझुंझार हायस्कूलचा दहावीला १००% निकाल; विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी

रणझुंझार हायस्कूलचा दहावीला १००% निकाल; विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी


बेळगाव : रणझुंझार शिक्षण संस्था संचलित रणझुंझार हायस्कूल, निलजी या शाळेने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी (एस.एस.एल.सी.) परीक्षेत १०० टक्के निकाल लावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या या यशस्वी परंपरेत यंदाही भर पडली असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांसह शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.

या परीक्षेत कु. यमुना नारायण पाटील हिने ५६२ गुण (८९.९%) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. मानसी महिपत पाटील (५२१ गुण, ८३.३%) हिने द्वितीय, कु. ऋषिकेश कल्लाप्पा मुकुंद (५१८ गुण, ८२.८%) याने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच कु. प्राची परशराम बेडकी (५०३ गुण, ८०.४%) हिने चौथा, तर कु. संजना संतोष पाटील (४८५ गुण, ७७.६%) हिने पाचवा क्रमांक मिळवत शाळेच्या यशात मोलाची भर घातली.

या उल्लेखनीय यशामागे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची जिद्द व कठोर परिश्रम तसेच पालकांचे सहकार्य हे महत्त्वाचे घटक ठरले असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.

रणझुंझार हायस्कूलने सातत्याने उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली असून यावर्षीचा १०० टक्के निकाल हा त्या परंपरेचीच साक्ष ठरला आहे.

या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विमलताई अशोकराव मोदगेकर तसेच संचालक मंडळाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen + thirteen =

error: Content is protected !!