राकसकोपच्या श्री पंचराशी देवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाच वार पाळण्याचा निर्णय; नातेवाईक व पाहुण्यांना गावात न येण्याचे आवाहन

राकसकोपच्या श्री पंचराशी देवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाच वार पाळण्याचा निर्णय; नातेवाईक व पाहुण्यांना गावात न येण्याचे आवाहन

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील राकसकोप येथील श्री पंचराशी देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या जीर्णोद्धारापूर्वी गावातील धार्मिक परंपरेनुसार पाच वार पाळण्याचा निर्णय देवस्थान पंच कमिटी आणि ग्रामस्थांनी घेतला आहे.

या निर्णयानुसार आज पहिला वार पाळण्यात येत असून, त्यानंतर पुढील आठवड्यात मंगळवार व शुक्रवार आणि त्यापुढील आठवड्यात मंगळवार व शुक्रवार असे एकूण पाच वार पाळण्यात येणार आहेत. पाचही वार पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.

या कालावधीत गावातील धार्मिक नियम आणि परंपरांचे पालन व्हावे, या उद्देशाने राकसकोप येथील बाहेरगावी वास्तव्यास असलेले नातेवाईक, पाहुणे तसेच बेळगाव परिसरातील राकसकोपशी संबंधित नागरिकांनी या पाच वारांच्या दिवशी गावात येणे टाळावे, असे आवाहन देवस्थान पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री पंचराशी देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य धार्मिक परंपरेनुसार आणि निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी सर्वांनी देवस्थान पंच कमिटीच्या निर्णयाचा आदर करून सहकार्य करावे, अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 4 =

error: Content is protected !!