बेळगाव : नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी ६७ व्या कार्तिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रात्री महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
उत्सवानिमित्त सकाळी ८ वाजता होमहवन, ९ वाजता लघुरुद्राभिषेक, ११ वाजता सत्यनारायण पूजा आणि दुपारी १२ वाजता महाआरती होणार आहे. सायंकाळी ७ वाजता मुख्य कार्तिकोत्सव पार पडणार असून रात्री ८ वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
ज्योतिर्लिंग देवस्थानच्या कार्तिकोत्सवाचे यंदा ६७ वे वर्ष आहे. या धार्मिक सोहळ्यात बेळगावसह आसपासच्या परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
