बेळगाव : नाथ पै तलावात बदकांची अंडी काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास घडली.
सतीश शशिकांत कदम (वय ३०), रा. लोहार गल्ली, अनगोळ, बेळगाव असे मृत युवकाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच H.E.R.F. Rescue Team, Belagavi यांना कळविण्यात आले. रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर सतीश कदम यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
तलाव, विहीर किंवा अन्य जलाशयांमध्ये उतरताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. पाण्याची खोली व तळाचा अंदाज नसताना पाण्यात उतरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
H.E.R.F. Rescue Team, Belagavi
Born to Serve, Ready to Save Lives.
📞 हेल्पलाइन : 9922899500
