श्री नामदेव दैवकी संस्थेतर्फे नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार

श्री नामदेव दैवकी संस्थेतर्फे नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार

बेळगाव : खडे बाजार, बेळगाव येथील श्री नामदेव दैवकी संस्थेच्या वतीने नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुरेश पिसे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासंघ, नवी दिल्लीचे कर्नाटक राज्य अध्यक्ष श्री. कृष्णाजी उरणकर आणि सचिव श्री. मधुसूदन पिसे यांचा श्री. अशोक रेळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच नामदेव समाजोन्नती परिषदेचे प्रमुख विश्वस्त श्री. राजेंद्र पोरे, श्री. वसंतराव खुर्द, श्री. सुरेश कुमठेकर, सचिव श्री. प्रवीण शिंत्रे आणि संपर्कप्रमुख श्री. महेश मांढरे यांचाही सत्कार करण्यात आला. दावणगिरी समाजाचे अध्यक्ष श्री. सतीश कुमार पिसे आणि सौ. सविता पिसे यांचा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रवीण कनेरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. महेश खटावकर यांनी केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. रोहन उरणकर, श्री. राजेश पतंगे, श्री. सतीश उंडाळे, श्री. सुहास खटावकर, श्री. रविकांत पिसे, श्री. उमेश पिसे, श्री. पांडुरंग व्हावळ, श्री. देवेंद्र हावळ, श्री. हेमंत हावळ, श्री. हरीश चिकोर्डे, श्री. महादेव पाटुकले, श्री. प्रमोद काकडे, श्री. यशवंत परदेशी, श्री. कपिल खटावकर, श्री. प्रकाश चिकोर्डे, श्री. राजेंद्र माळवदे, श्री. अमर कोपर्डे, श्री. भरत चिकोर्डे, श्री. नारायण कुमठेकर, श्री. दीपक कुमठेकर, श्री. राजू कुमठेकर, श्री. बाळकृष्ण काकडे, श्री. शंकर सदरे, मंदिराचे पुजारी विकास उरणकर, सौ. माला सदरे, राधा श्याम आणि बाबू पिसे यांच्यासह समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + 19 =

error: Content is protected !!