नागपंचमीनिमित्त मुचंडी मळ्यात श्री नागदेवता मंदिरात धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन

नागपंचमीनिमित्त मुचंडी मळ्यात श्री नागदेवता मंदिरात धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन

बेळगाव : महात्मा फुले रोड, मुचंडी मळा येथील श्री नागदेवता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता लघुरुद्राभिषेक, तर सकाळी ९ वाजता सुदर्शन होम करण्यात येणार आहे. तसेच यावेळी सांप्रदायिक भजनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

धार्मिक कार्यक्रमांनंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी श्री नागदेवतेचे दर्शन घेऊन धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : श्री नागदेवता मंदिर, महात्मा फुले रोड, कोपर पेपर रेस्टॉरंटच्या मागे, मुचंडी मळा, बेळगाव.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 1 =

error: Content is protected !!