बेळगाव : आदर्श गुणविकास प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालय, भाग्यनगर या शाळेने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यावर्षी शाळेतील एकूण 59 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकालाच्या गुणवत्तेनुसार 6 विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता श्रेणी, 37 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 10 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर 6 विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी मिळवली आहे.
शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मलिक रेहान सय्यद (93.6%), अक्षता देवन (91.36%), सायली कुंडेकर (91.2%), वेदश्री सावंत (89.12%) आणि स्फूर्ती कमार (88.48%) यांनी अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले.
या यशामागे मुख्याध्यापिका सविता जे. के. यांचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षकवृंदाचे परिश्रम लाभले असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
