बेळगाव : शहरातील शाहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात आरोपीला तब्बल ३७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तसेच १ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. या घटनेनंतर पीडित मुलगी गर्भवती झाल्याचे समोर आले. याप्रकरणी शाहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 112/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमे तसेच POCSO कायदा 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सिद्धप्पा सिमानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
सदर प्रकरणाची सुनावणी विशेष POCSO न्यायालयात झाली. प्रकरणातील पुरावे व युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी तनोज बाबू गाडिवड्डर (वय २०, रा. दड्डी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) याला दोषी ठरवत ३७ वर्षांची शिक्षा आणि दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल ९ एप्रिल २०२६ रोजी देण्यात आला.
या खटल्यात सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच तपासात सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.
#Belgav #BedhadakBelgav
