जखमी गरुडाला वेळेत मदत; बचाव पथकाची तत्पर कारवाई

जखमी गरुडाला वेळेत मदत; बचाव पथकाची तत्पर कारवाई

बेळगाव, १० एप्रिल २०२६ : येथील फॅमिली कोर्टाचे प्रिन्सिपल जज श्री. जी. व्ही. चंद्रशेखर यांच्या निवासस्थानावरून मिळालेल्या तातडीच्या कॉलनंतर एका जखमी गरुडाचा यशस्वी बचाव करण्यात आला. झाडावर धडक दिल्यामुळे हा गरुड जखमी अवस्थेत आढळून आला होता.

माहिती मिळताच बचाव पथकातील अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, विक्की मेहता, शशिकांत आंबेवाडकर, गौतम श्रॉफ आणि मायकेल पिंटो यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गरुडाला प्राथमिक उपचार देत पुढील उपचारासाठी शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले.

त्यानंतर गरुडाची सुरक्षितपणे वनविभाग, बेळगाव यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. या संपूर्ण कारवाईत न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर दिलेल्या माहितीमुळे मोठी मदत झाली.

या तत्परतेमुळे एका दुर्मिळ पक्ष्याचे प्राण वाचवण्यात यश आले असून, संबंधित सर्वांचे कौतुक केले जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − 17 =

error: Content is protected !!