अल्पवयीन मुलाकडून दुचाकी चालविल्याप्रकरणी पालकांवर कारवाई; ₹25 हजार दंड

अल्पवयीन मुलाकडून दुचाकी चालविल्याप्रकरणी पालकांवर कारवाई; ₹25 हजार दंड

बेळगाव : शहरातील पोस्टमन सर्कल परिसरात 29 मे 2026 रोजी रात्री सुमारे 8.42 वाजता वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन मुलगा दुचाकी चालवत असल्याचे आढळून आले. संबंधित दुचाकी (क्र. KA-22/HH-1441) ताब्यात घेण्यात आली.

यानंतर मुलाच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हा दंडनीय गुन्हा असल्याची माहिती देण्यात आली. मोटार वाहन कायद्यानुसार वाहन मालकाविरुद्ध नोटीस बजावण्यात आली असून त्यांना न्यायालयात ₹25,000 दंड भरावा लागणार आहे.

वाहतूक पोलिसांनी शहरातील पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या अल्पवयीन मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालविण्यास देऊ नये. वाहतूक नियमांचे पालन करून मुलांच्या तसेच इतर नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + 2 =

error: Content is protected !!