हिंडलगा नगरपंचायतीच्या वतीने श्री शिव–बसव जयंती उत्साहात साजरी

हिंडलगा नगरपंचायतीच्या वतीने श्री शिव–बसव जयंती उत्साहात साजरी

हिंडलगा, दि. 20 (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून इतिहास घडवला, तर जगतज्योती बसवेश्वरांनी भक्तिमार्गातून मानवतेचा संदेश संपूर्ण समाजात रुजवला, असे प्रतिपादन नगरपंचायत अभिवृद्धी अधिकारी शांताप्पा हादीमणी यांनी केले.

हिंडलगा नगरपंचायतीच्या वतीने कार्यालयात दि. 20 रोजी श्री शिव–बसव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास हिंडलगा केंद्राचे सीआरपी सतीश पाटील प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली. संतोष नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि जगतज्योती बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी शांताप्पा हादीमणी आणि सतीश पाटील यांनी प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. नगरपंचायतीतील सर्व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन देवाप्पा जगताप यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 − 8 =

error: Content is protected !!