हिंडलगा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील जनगणना गणतीदारांना प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

हिंडलगा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील जनगणना गणतीदारांना प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

हिंडलगा, दि. 17 (वार्ताहर) : हिंडलगा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील 29 वार्डांतील 29 जनगणना गणतीदार व 5 निरीक्षक यांना जनगणना प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम दि. 16 रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमास नगरपंचायत अभिवृद्धी अधिकारी शांताप्पा हादीमनी, निरीक्षक साधना हन्नूरकर, सतीश पाटील, पी. एम. रजपूत, जी. जी. पाटील, संपन्नमूल व्यक्ती सागर हराडे तसेच निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शांताप्पा हादीमनी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी भारतीय जनगणनेचे महत्त्व स्पष्ट करून प्रशिक्षणार्थींना जबाबदारीपूर्वक काम करण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या जनगणना संचालनालयामार्फत दर 10 वर्षांनी होणारी जनगणना अत्यंत काळजीपूर्वक पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षणात प्रत्येक वार्डातील गणतीदारांनी वायव्य दिशेकडून घड्याळाच्या काट्याप्रमाणे घरांची नोंदणी करणे, पक्की व कच्ची घरे, रस्ते, गल्ल्या यांची अचूक माहिती संकलित करणे, तसेच वार्डाचा नकाशा तयार करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक घराला लाल स्केच पेनने क्रमांक देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

सागर हराडे यांनी प्रशिक्षणार्थींना मराठी व कन्नड अशा दोन्ही भाषेत माहिती दिली. प्रत्येक गणतीदाराला गाव व वार्डाचे नकाशे, नमुना फॉर्म व लाल स्केच पेन देण्यात आले. प्रत्येक गणतीदाराला सुमारे 200 ते 250 कुटुंबांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कार्यक्रमास ग्रामपंचायत कर्मचारी संतोष नाईक, देवाप्पा जगताप, बाळू मास्ते आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन संतोष नाईक यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 4 =

error: Content is protected !!