हाजगोळी येथे बेळगावच्या तरुणाचा मृत्यू. २० फूट खोल पाण्यातून २२ वर्षीय युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात HERF रेस्क्यू टीमला यश

हाजगोळी येथे बेळगावच्या तरुणाचा मृत्यू. २० फूट खोल पाण्यातून २२ वर्षीय युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात HERF रेस्क्यू टीमला यश

बेळगाव : हाजगोळी येथील डॅम परिसरात पाण्यात पडलेल्या २२ वर्षीय युवकाचा मृतदेह तब्बल १८ ते २० फूट खोल पाण्यातून बाहेर काढण्यात हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन (HERF) टीमला यश आले. रात्रीभर सुरू असलेल्या अथक शोधमोहीमेनंतर ही मोहीम यशस्वी ठरली.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार नामदेव पाटील (वय २२) हा युवक काल सायंकाळी सुमारे ८:३० वाजण्याच्या सुमारास हाजगोळी डॅम परिसरात पाण्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच HERF रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी युवकाचे कपडे आणि बोट किनाऱ्यावर आढळून आले, मात्र तो नेमका कोणत्या ठिकाणी बुडाला याची स्पष्ट माहिती उपलब्ध नव्हती.

अंधार, खोल पाणी आणि मर्यादित माहितीमुळे शोधकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले होते. तरीही HERF च्या रेस्क्यू जवानांनी अत्याधुनिक अंडरवॉटर कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू ठेवली. रात्री युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले, मात्र ज्या ठिकाणी मृतदेह आढळला तेथे सुमारे १८ ते २० फूट खोल असल्याने मृतदेह बाहेर काढणे अत्यंत कठीण ठरत होते.

“सेवाही आमचा धर्म” हे ब्रीद जपत HERF टीमने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अथक प्रयत्न सुरू ठेवले. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास युवकाचा मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला.

ही मोहीम केवळ रेस्क्यू ऑपरेशन नसून दुःखात असलेल्या कुटुंबाला त्यांच्या मुलाचा शेवटचा निरोप घेण्याची संधी देणारा मानवी प्रयत्न असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

स्वर्गीय ओंकार नामदेव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व HERF रेस्क्यू जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − seven =

error: Content is protected !!